Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा कहर! रस्ते खचले, ट्रॅक्टर वाहून गेलं, घरांमध्येही शिरलं पाणी

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा कहर! रस्ते खचले, ट्रॅक्टर वाहून गेलं, घरांमध्येही शिरलं पाणी

| Updated on: May 25, 2025 | 6:24 PM

Pune Rain News Updates : पुण्यात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे सगळीकडे पाणी भरलं असून नागरिकांचे हाल झालेले बघायला मिळाले आहेत.

मुसळधार पावसामुळे पुण्यातील भिगवण परिसर जलमय झालेला बघायला मिळाला आहे. तर पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गाला ओढ्याचं रूप आलेलं आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे जवळपास 3 किमीचा सर्व्हिस रोड पाण्याखाली गेलेला आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचलेला असून झाडं देखील उन्मळून पडलेली आहेत. घरामध्ये देखील पाणी शिरल्याने नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत.

पुणे जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. मुसळधार पावसाच्या सरींमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलेलं बघायला मिळालं आहे. त्यामुळे रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आल्याने वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झाला आहे. या पावसामुळे इंदापूर तालुक्यातील भिगवण बस स्थानकात देखील पाणीचपाणी झालेलं बघायला मिळालं. याठिकाणी पावसाच्या पाण्यात ट्रॅक्टर देखील वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. तर पुणे – सोलापूर महामार्गावर एक गाडी वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.

Published on: May 25, 2025 06:24 PM