Indrayani Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, कारण आलं समोर? 20-25 जणं क्षणात गेले वाहून अन्..
पुण्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. मात्र हा पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20-25 लोक वाहून गेल्याची माहिती मिळतेय.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळ्याजवळ एक मोठी घटना घडली आहे. कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून २० ते २५ जण वाहून गेल्याचे समोर आले आहे. तर या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. वाहून गेलेल्या नागरिक आणि पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आमदार सुनिल शेळके यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून घटनास्थळी एनडीआरएफचे जवान दाखल झाले आहेत. तर ही घटना घडल्याचे कारण आता समोर आले आहे. कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पुलावर पर्यटकांनी दुचाकी नेल्यानं ओव्हारवेट होऊन पूल कोसळला असल्याची प्राथमिक मोठी माहिती समोर आली आहे. कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पुलाचं स्वरूप जीर्ण झालेलं होतं. याच पुलावरून नदी ओलांडताना अनेक पर्यटकांनी वाहनं नेलीत. त्यामुळे वजन वाढले आणि पूल कोसळला.
