मंदिर परिसरात अनधिकृत मस्जिदचं बांधकाम केलं जात असल्याचा मनसेचा आरोप, पोलिसांकडून थेट कृती

| Updated on: Mar 25, 2023 | 10:22 AM

Pune MNS : गुढीपाडव्याच्या सभेत माहिममधील मजार आणि सांगलीतील मस्जिदबाबत राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर पुण्यातील मस्जिद बांधकामाबाबतही मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पाहा व्हीडिओ...

Follow us on

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत माहिममधील मजार आणि सांगलीतील मस्जिदबाबत आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर पुण्यातील मस्जिद बांधकामाबाबतही मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंदिर परिसरात अनधिकृत मस्जिदचं बांधकाम केलं जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. राज्य सरकारने या ठिकाणी उत्खनन करावं, अशी मागमी मनसेने केली आहे. मनसेच्या आरोपानंतर मंदिर परिसरात पुणे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांचा मुद्दा चर्चेत आलाय. यासंदर्भात मनसे सरचिटणीस अजय शिंदे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत शिंदे कागदपत्रांसह पुरावे मांडणार असल्याचं मनसेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.