एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक; ‘या’ मागणीसाठी पुण्यात आंदोलन

एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक; ‘या’ मागणीसाठी पुण्यात आंदोलन

| Edited By: | Updated on: Apr 03, 2023 | 12:39 PM

पुण्यात बालगंधर्व चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांकडून पुन्हा आंदोलन केलं जात आहे. टायपिंग स्किल टेस्टमध्ये आयोगाने बदल केला आहे. त्याविरोधात एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

पुणे : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन करत आहेत. लिपिक टंकलेखक आणि कर सहायक्क कौशल्य चाचणीबाबत हे आंदोलन होत आहेत. महाराष्ट्र आयोगाने टायपिंग स्किल टेस्ट ही महाराष्ट्र परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार न घेता अचानक त्यात बदल केले आहेत. ही टेस्ट राज्य परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार केली पाहिजे या मागणीसाठी विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले आहेत. राज्य परीक्षा परिषद नियमानुसार स्किल टेस्ट घ्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही असंच रस्त्यावर उतरू, असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Published on: Apr 03, 2023 12:39 PM