Pune Municipal Elections :  कार, हेलिकॉप्टर राईडपासून ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स

Pune Municipal Elections : कार, हेलिकॉप्टर राईडपासून ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स

| Updated on: Dec 25, 2025 | 6:10 PM

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना विविध प्रकारच्या भन्नाट ऑफर्स दिल्या जात आहेत. यात चारचाकी वाहन, हेलिकॉप्टर राईड, थायलंड टूर आणि एक गुंठा जमिनीचा समावेश आहे. धानोरी प्रभाग क्रमांक एकमध्ये लकी ड्रॉद्वारे जमिनीचे आश्वासन दिले जात आहे, तर कसबा प्रभाग 25 मध्ये महिलांना हेलिकॉप्टर राईडची संधी मिळत आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक भन्नाट ऑफर्स दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. या ऑफर्समध्ये चारचाकी वाहन, हेलिकॉप्टर राईड, थायलंडचा पाच दिवसांचा टूर आणि एक गुंठा जमिनीचे आमिष दाखवले जात आहे. यासंदर्भात अनेक पोस्टर्स व्हायरल होत आहेत, ज्यामुळे या ऑफर्सची चर्चा सर्वत्र पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धानोरी प्रभाग क्रमांक एकमध्ये एका इच्छुक उमेदवाराने मतदारांना लकी ड्रॉद्वारे एक गुंठा जमीन देण्याचे आश्वासन दिले आहे. तर कसबा प्रभाग 25 मध्ये महिलांसाठी एक अनोखी ऑफर देण्यात आली आहे. पैठणीचा खेळ जिंकणाऱ्या महिलांना चक्क हेलिकॉप्टर राईडचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. याशिवाय, प्रभाग क्रमांक तीनमधील एका इच्छुक उमेदवाराकडून मतदारांना परदेशवारीचे आमिष दाखवले जात आहे. पुणे शहरात अशा प्रकारच्या निवडणूकपूर्व ऑफर्सनी राजकीय वर्तुळात आणि मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

Published on: Dec 25, 2025 06:10 PM