Pune : कुठं जाळपोळ तर कुठं दगडफेक, दौंडच्या यवतमध्ये तणावाचं वातावरण, नेमकं घडलं काय?

Pune : कुठं जाळपोळ तर कुठं दगडफेक, दौंडच्या यवतमध्ये तणावाचं वातावरण, नेमकं घडलं काय?

| Updated on: Aug 01, 2025 | 3:42 PM

दौंड तालुक्यातील यवतमध्ये व्हॉट्सअॅप ग्रृपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला आहे. या तणावामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे.

पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला आहे. व्हॉट्सअॅप ग्रृपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळतेय. यवतमध्ये दोन गटात वाद निर्माण झाल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान दोन गटातील तणावामुळे यवतमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दोन गटात तणाव निर्माण झाल्याने जमाव काहिसा आक्रमक झाला होता. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यावेळी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्यात आणि जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. समोर आलेल्या माहितीनुसार, एका तरुणाने व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने हा तणाव निर्माण झाला. यवतमध्ये सकाळपासून तणावाचे वातावरण होतं. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली तर काही ठिकाणी जाळपोळ केल्याचीही घटना पाहायला मिळाली.

Published on: Aug 01, 2025 03:41 PM