खडसेंच्या जावयाच्या मोबाईलमध्ये मुलींचे ‘ते’ व्हिडीओ; चॅटमधून देखील खळबळजनक माहिती समोर

खडसेंच्या जावयाच्या मोबाईलमध्ये मुलींचे ‘ते’ व्हिडीओ; चॅटमधून देखील खळबळजनक माहिती समोर

| Updated on: Jul 31, 2025 | 5:33 PM

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट सापडल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली.

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपहार्य व्हिडीओ आणि चॅट सापडले असल्याची माहिती पोलिसांनी आज कोर्टात दिली आहे. खेवलकर यांनी मुलीचे व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवले होते. तसंच मुलीचे व्हिडीओ पाठवत असा माल हवा असा मेसेज देखील केला असल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केला आहे. सध्या युक्तिवाद संपलेला असून काहीवेळातच निकाल येणार आहे. दरम्यान, प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर आरोपींची आणखी 3 दिवस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर खेवलकर यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला जात असून या प्रकरणातील महिला देखील पोलिसांनीच बनाव रचून आणली असल्याचा आरोप खेवलकर यांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. त्यामुळे आता यावर कोर्टाकडून काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Published on: Jul 31, 2025 05:33 PM