Swargate Bus Crime : ‘माझी इच्छा नसतानाही अनेक पुरूष पोलीस अधिकाऱ्यांनी…’, पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

Swargate Bus Crime : ‘माझी इच्छा नसतानाही अनेक पुरूष पोलीस अधिकाऱ्यांनी…’, पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

| Updated on: Mar 27, 2025 | 2:49 PM

पुरूष वैद्यकीय अधिकारी माझी इच्छा नसताना माझी चाचणी करायचे, असं पीडितेने म्हणत हे गंभीर आरोप केले आहेत. तर केसमध्ये सरकारी वकील म्हणून सरोदेंची नियुक्ती करण्याचीही मागणी यावेळी पीडितेने केली.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील पीडितेने पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पिडीत तरुणीने राज्याच्या प्रधान सचिव यांना पाठवलेलं पत्र टीव्ही नाईन मराठीच्या हाती लागलं आहे. यामध्ये पीडितेने असं म्हटलंय की, पुरुष वैद्यकीय अधिकारी इच्छा नसताना माझी संमती घ्यायचे, माझी वैद्यकीय चाचणी करायचे. अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्यावर कसा अत्याचार केला हे सांगायचं आहे. आरोपी दत्ता गाडेने माझ्यावर दोन वेळा बलात्कार केला. आरोपी दत्ता गाडेने माझ्यावर तिसऱ्यांदा अनैसर्गिकपणे बलात्काराचा प्रयत्न केला. पूर्ण ताकदीने मी विरोध केला त्यानंतर दत्ता गाडे पळून गेला. तीन वकिलांची नावं सुचवू त्यातून एक वकील तुम्ही निवडा, असं पुणे पोलीस म्हणाले.

असीम सरोदे यांची नेमणूक करण्याची माझी मागणी होती. मात्र एक दिवस उशीर झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. अन्यायग्रस्त मुलगी म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच महत्त्व नाही असा कायदा आहे का? अॅडव्होकेट अजय मिसार यांच्याबाबत आत्ताच आक्षेप घ्यायचं कारण नाही. मात्र माझ्याकडे आक्षेप घेण्यासारखी माहिती आहे हे नक्की. घटनेदरम्यान आरडाओरडा केला पण माझा आवाज खोल गेला. माझ्या मनात बलात्कार झालेल्या अनेक घटना आल्या आणि त्यातून मी जीव वाचवणं महत्त्वाचं मानलं, पिडीतेचा पत्रात उल्लेख केलाय.

Published on: Mar 27, 2025 02:49 PM