तानाजी सावंतांचं ‘ते’ वक्तव्य दुर्दैवी; जबाबदार लोकांनी…, मराठा आरक्षणाच्या वक्तव्यावर काय म्हणाले विखे पाटील?

| Updated on: Sep 26, 2022 | 2:49 PM

मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. आता या सर्व प्रकरणावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Follow us on

नागपूर : मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. आता या सर्व प्रकरणावर महसूलमंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी तानाजी सावंत यांच्यासोबत चर्चा झाली नाही. मात्र त्यांनी जर तसं वक्तव्य केलं असेल तर ते दुर्दैवी आहे. जबाबदार व्यक्तींनी बोलताना विचार करायला पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकावर जोरदार टीका केली आहे. 100 कोटी प्रकरणात महाविकाआघाडीचा एक नेता तुरुंगात आहे. असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला. तर बेताल वक्तव्य करणारे एक प्रवक्ते देखील जेलमध्ये असल्याचं म्हणत त्यांनी नाव न घेता संजय राऊत यांच्याकडे इशारा केला आहे.