Padma Award 2026 | पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
केंद्रसरकार कडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कला, साहित्य, समाजसेवा, उद्योग तसेच अन्य वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. दरम्यान, या वर्षी महाराष्ट्रातील काही मान्यवरांनाही पद्म पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे. परभणीचे श्रीरंग लाड, रघुवीर खेडकर यांसारख्या इतरही काही मान्यवरांना हा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातीलच अर्मिडा फर्नांडीस यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. परभणीचे श्रीरंग लाड यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ते एक शेतकरी आहेत. त्यांनी कापूस या पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष संशोधन केलेले आहे. त्यांच्याच कामाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. यासह महाराष्ट्रातीलच भिकल्या लाडक्या धिंडा यांनादेखील पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.