सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवं, त्याशिवाय..; ऑपरेशन सिंदूरवर राहुल गांधींची मोठी प्रतिक्रिया

सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवं, त्याशिवाय..; ऑपरेशन सिंदूरवर राहुल गांधींची मोठी प्रतिक्रिया

| Updated on: Jul 29, 2025 | 5:56 PM

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर सलग दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू आहे. यावेळी राहुल गांधी यांनी यावर भाष्य केलं.

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर सलग दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू आहे. दुपारच्या सत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर भाष्य केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या मुद्यावर सरकारवर टीका केली. संसदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्यांना बंधने घालता येणार नाहीत. जर तुम्हाला त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी हवी असेल, तर त्यांना मोकळीक द्यावी लागेल. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत – राजकीय इच्छाशक्ती आणि पूर्ण स्वातंत्र्य. सैन्याला प्रभावीपणे कार्य करायचे असेल, तर त्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी असायला हव्यात.

राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात १९७१ च्या युद्धाचा उल्लेख केला. त्या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सैन्याला स्पष्ट सांगितले होते की, ज्याला यायचे आहे तो येऊ दे, आम्ही आमचे काम पूर्ण करू. जनरल सॅम माणेकशॉ यांनी इंदिराजींना सांगितले की, उन्हाळ्यात ऑपरेशन करणे शक्य नाही. तेव्हा इंदिराजींनी त्यांना सांगितले, ‘तुम्हाला हवा तितका वेळ घ्या, तुम्हाला कृती करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.

Published on: Jul 29, 2025 05:56 PM