Monsoon Session : विधानसभेत वाघाचा मुद्दा; वाघावर कोणाचा कंट्रोल? मिश्किल टिपण्णी अन् एकच हशा
Monsoon Session 2025 LIVE : वाघाच्या चर्चेवर राहुल नर्वेकर यांनी दिलेल्या मिश्किल उत्तराने विधानसभेत हशा पिकला आहे.
वाघाच्या हल्ल्यातील मृत्यूंवरून विधानसभेत चर्चा सुरू असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या मिश्किल उत्तराने सभागृहात चांगलाच हशा पिकला आहे. वाघावर कोणाचा कंट्रोल आहे? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला. त्यावर उत्तर देताना राहुल नार्वेकर यांनी वाघावर कोणाचा कंट्रोल हे सध्या अस्पष्ट असल्याचं मिश्किलपणे म्हंटलं आहे. दरम्यान, वाघाची आता शेळी झाली असल्याची टिपण्णी जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे.
वाघामुळे झालेल्या मृत्यूवर बोलताना भास्कर जाधव यांनी वाघावर कोणाचा कंट्रोल आहे? असा प्रश्न सभागृहात विचारला. त्यानंतर वाघावर कोणाचा कंट्रोल हे सध्या अस्पष्ट आहे, असा मिश्किल टोला विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर यांनी लगावला. त्यावर हशा पिकलेला असतानाच जितेंद्र आव्हाड यांनी देखील यात सहभाग घेत वाघाची आता शेळी झाली आहे, अशी टिपण्णी केल्याने एकच हशा पिकला.
