Balasaheb Thackeray यांच्या जयंतीला Rahul, Priyanka Gandhiनी एक ट्वीटही केलं नाही -Devendra Fadnavis

Balasaheb Thackeray यांच्या जयंतीला Rahul, Priyanka Gandhiनी एक ट्वीटही केलं नाही -Devendra Fadnavis

| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 7:44 PM

आम्ही बाळासाहेबांबद्दल नेहमी बोलतो त्यांना अभिवादन करतो. आमच्यासाठी ते वंदनीय आहेत. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना अभिवादन करणारं साधं ट्विटही केलं नाही.

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोदींपासून शहापर्यंत आणि फडणवीसांपर्यंत सर्वांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून अभिवादन केलं. पण सोनिया गांधी, प्रियंका आणि राहुलने अभिवादनाचं ट्विट केलं नाही. आघाडीत असूनही त्यांनी अभिवादन केलं नाही, हे लक्षात आणून देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही बाळासाहेबांबद्दल नेहमी बोलतो त्यांना अभिवादन करतो. आमच्यासाठी ते वंदनीय आहेत. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना अभिवादन करणारं साधं ट्विटही केलं नाही. आधी त्यांच्याकडून ट्विट करून दाखवा. ते ट्विटही करत नाहीत. तरीही तुम्ही त्यांच्या मांडिला मांडी लावून बसत आहात. किती लाचार आहात तुम्ही. ज्यांना बाळासाहेबांना अभिवानद करायला लाज वाटते, त्यांच्यासोबत तुम्ही आहात अन् वर आम्हाला ज्ञान पाजळता?, अशी टीकाही त्यांनी केली.