Raj Thackeray | पुणे महापालिका निवडणुकीसाठी ‘राज’ नीती, राज ठाकरेंचा 5 वा पुणे दौरा
शुक्रवारी शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर शहरातल्या अध्यक्षांची निवड घोषित केली जाणार आहे. आणि त्यानंतर शनिवारी राज ठाकरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित शाखाध्यक्ष यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.
पुणे : पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर आलेत. राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर असून शुक्रवारी शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर शहरातल्या अध्यक्षांची निवड घोषित केली जाणार आहे. आणि त्यानंतर शनिवारी राज ठाकरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित शाखाध्यक्ष यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी ही माहिती दिली.
