Raj Thackeray MNS : राज-फडणवीस यांच्यात बैठक होत असताना मनसे नेते शिवसेनेच्या बड्या मंत्र्याच्या भेटीला
ठाकरे बंधूंच्या दोन्ही बाजूंकडून युतीसाठी सकारात्मक घडामोडी सुरु असताना सकारात्मक पावलं उचलली जात होती. त्यात अचानक राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तर दुसरीकडे मनसे नेते उदय सामंतांच्या भेटीला गेलेत.
सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या युती चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातच भेट झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील वांद्रयाच्या ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांची साधारण तासभर बैठक झाली. ही बैठक होत नाही तोपपर्यंत मनसे नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भेटीला दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे नेते संदीप देशपांडेंसह अमेय खोपकर हे देखील मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला दाखल झालेत. मात्र त्यांच्या भेटीचं कारण अद्याप समोर आलं नाही.
Published on: Jun 12, 2025 01:50 PM
