MNS Ratnagiri : मोठी बातमी, कोकणात मनसेला मोठा धक्का! राज ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार भाजपचं कमळ हाती घेणार?

MNS Ratnagiri : मोठी बातमी, कोकणात मनसेला मोठा धक्का! राज ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार भाजपचं कमळ हाती घेणार?

| Updated on: Aug 25, 2025 | 12:49 PM

कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय.

महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल येत्या काही महिन्यात वाजण्याची शक्यता असताना या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील मनसेचे कोकण संघटक व राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. वैभव खेडेकर यांनी नुकतीच काल भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याच्या चर्चा कोकणात खुलेआम सुरू झाल्यात.

कोकणातील राज ठाकरेंचा प्रमुख शिलेदार म्हणून ओळख असणारे वैभव खेडेकर यांनी 2014 मध्ये दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती तर खेड नगरपरिषद निवडून आणण्यात त्यांचा मोठा होता इतकंच नाहीतर त्यांनी नगराध्यक्ष पद देखील भूषविलं आहे. असं असताना त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यास मनसेला रत्नागिरीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Published on: Aug 25, 2025 12:49 PM