कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल…काय म्हणाले राज ठाकरे ?

कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल…काय म्हणाले राज ठाकरे ?

| Updated on: Jan 11, 2026 | 10:07 PM

राज ठाकरे यांनी मुंबईच्या महानगर पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर तडाखेबंद भाषण केले आहे. यावेळी मराठी माणूस पैसे फेकले तर विकला जातो ही आपली किंमत आहे काय असा सवालही त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर जोरदार भाषण केले. कधी काळी देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र, सर्व बाजूने संपन्न महाराष्ट्रावर हे सर्व बाजूने येत आहेत. हे फक्त तुमचे चावे घेत आहेत. तुम्हाला उद्ध्वस्त करायचे आहे. उठा या जमिनीवरून. आम्ही येत आहोत असे हे धमकावत आहेत असे राज ठाकरे यांनी भीती दाखवत सांगितले. ते पुढे म्हणाले की हिरे असतात, मोती, चांदी असते. अजून मौल्यवान गोष्टी असतात. फक्त जमिनीलीच ‘रिअल इस्टेट’ म्हणतात. खरी संपत्ती म्हणतात. दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला रिअल इस्टेट म्हणत नाही. जमीन पायाखालची गेली तर सर्व संपलं. जगातील अनेक देश जमीन गेल्याने संपले. संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणारे धनिक होते. गुजराती होते, पण धनिक होते. आज हे संकट तुमच्या उंबरठ्यावर आलं आहे. कधी तुमच्या दरवाज्यावर टकटक होईल तुम्हाला कळणार नाही असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. कोकणपट्टी रिकामी केली जात आहे. जमिनीच्या जमिनी विकत घेतल्या जात आहे. त्यावेळी बुलेट ट्रेनला मी विरोध केला. आताही मी विरोध केला आहे. अहमदाबादमध्ये ढोलेना नवीन शहर बसवलं जातं. मुंबईपेक्षा दीडपट मोठं आहे. तिथे वेदांत आणि फॉक्सकॉनचे सेमी रुल्स येत आहेत. वसई विरारपासून कसे भरत येत आहे, बघा असे इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी केला.

 

Published on: Jan 11, 2026 10:05 PM