Raj Thackeray : अन् राज ठाकरेंकडून भावाची पाठराखण, म्हणाले..

Raj Thackeray : अन् राज ठाकरेंकडून भावाची पाठराखण, म्हणाले..

| Updated on: Jun 30, 2025 | 4:43 PM

Raj Thackeray PC : हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले किंवा रद्द करायला त्यांना भाग पाडलं त्यासाठी मी महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेचं अभिनंदन करेल. हा विषय श्रेय घेण्याचा नाही. सरकारकडून विषय निघाला तेव्हा सर्वात आधी आम्ही विरोध केला. उद्धव ठाकरेंची शिवसेना, पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल इतरही राजकीय पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हंटलं आहे.

यावेळी पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, मराठी ताकद काय आहे हे राज्य कर्त्यांना कळलं. हा मोर्चा निघाला तर न भुतो असा मोर्चा निघाला असता. 70-75 वर्षाच्या लोकांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा कालावधी आठवला असता.  मराठी माणूस एकत्र आला की काय होतं हे कळलं. परत सरकार असल्या भानगडीत जाणार नाही अशी मी आशा, अपेक्षा बाळगतो,” असं सूचक विधानही राज यांनी केलं. त्याचप्रमाणे, “या गोष्टींची काही आवश्यकता, गरजच नव्हती,” असं म्हणत राज यांनी हा वाद उगाच उकरुन काढल्याचं म्हटलं.

Published on: Jun 30, 2025 04:43 PM