‘मोदीजी, महिन्यातून 2 दिवस लॉकडाऊन ठेवा’ : राज ठाकरे
नरेंद्र मोदींना पत्र लिहावं वाटतं की महिन्यातले दोन दिवस लॉकडाऊन लावा, अशी मिशकील टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.
23 मार्चला लॉकडाऊन लागलं होतं. शिवाजी पार्क समोर होतं, मला फक्त पक्षांचे आवाज ऐकू येत होते. इतकी शांतता मला त्यावेळी अनुभवायला मिळाली. गावाकडे निघालेलो असताना तशा प्रकारची शांतता अनुभवायला मिळत असते. त्या काळात कोकिळेचा कुहू कुहूचा आवाज कोविड कोविड असा ऐकायला येत होता. नरेंद्र मोदींना पत्र लिहावं वाटतं की महिन्यातले दोन दिवस लॉकडाऊन लावा, अशी मिशकील टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.
