Rakesh Kishore : माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन् सनातन…
भारताचे माजी सरन्यायाधीश (सीजेआय) भूषण गवई यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांना दिल्लीच्या करकरडूमा न्यायालय संकुलात वकिलांनी बूट आणि चप्पलने मारहाण केली.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांना दिल्लीच्या करकरडूमा न्यायालय परिसरात वकिलांनी चप्पलांनी मारहाण केली. माजी मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकून गोंधळ घालणारे वकील राकेश किशोर यांना भूषण गवई यांनी माफ केले. तथापि, काही वकिलांनी त्यांना न्यायालय परिसरातच चप्पलांनी मारहाण केली असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. राकेश किशोर न्यायालयात उपस्थित असताना ही घटना घडली तेव्हा काही वकिलांनी त्यांच्यावर हल्ला केला. राकेश यांना ढकलण्यात आले आणि चप्पलांनी हल्ला करण्यात आला. यावेळी न्यायालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्यांना बाहेर काढले. दरम्यान, भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्यानंतर राकेश किशोर यांना बार कौन्सिलने निलंबित केले होते. त्यांनी केलेल्या कृतीचा व्यापक निषेध होत असताना किशोर यांनी त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नसल्याचे म्हटले होते.
