Special Report | दिशा प्रकरणात Sachin Vaze कनेक्शन ?

Special Report | दिशा प्रकरणात Sachin Vaze कनेक्शन ?

| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 9:03 PM

आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सकाळ-सकाळी एकामागून एक चार ट्वीट्स करत दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियान (Disha Salian) यांच्या मृत्यू प्रकरणावरुन उडालेला धुरळा काही केल्या शांत होताना दिसत नाही. राणे कुटुंबीयांनी दिशा सालियानच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. दोघांच्या मृत्यूला दीड वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका आजही सुरुच आहे. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सकाळ-सकाळी एकामागून एक चार ट्वीट्स करत दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. दिशाला ज्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून मालाडला नेण्यात आली, ती वाझेची आहे का, असं नितेश राणेंनी सुचवलं आहे.