Rane Brothers : सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा.. , ‘ते’ विधान अन् राणे बंधूंचं शाब्दिक युद्ध पेटलं

Rane Brothers : सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा.. , ‘ते’ विधान अन् राणे बंधूंचं शाब्दिक युद्ध पेटलं

| Updated on: Jun 08, 2025 | 5:17 PM

Nitesh And Nilesh Rane : नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर आता राणे बंधूंमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालेलं दिसून आलं आहे.

महायुतीतले राणे बंधु आता आपसात भिडले आहेत. मंत्री नितेश राणे यांच्या व्यक्तव्याला निलेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. 2029 ला सर्व खासदार आणि आमदार भाजपचेच आले पाहिजेत, असं देखील नितेश राणे यांनी म्हंटलं होतं. भाजप कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं. तर यावर नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत नितेश राणेंनी जपून बोलावं असा सल्ला दिला आहे. महायुतीमधील वातावरण चांगलंच राहिलं पाहिजे, असंही निलेश राणे यांनी यावेळी म्हंटलं आहे. त्यामुळे आता राणे बंधूंमध्ये शाब्दिक युद्ध पेटलेलं बघायला मिळालं आहे.

Published on: Jun 08, 2025 05:17 PM