Raosaheb Danve | केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे जेव्हा सारीपाट खेळतात
कायम कोणत्या न कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत असणारे भाजपा नेते रावसाहेब दानवे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते सारीपाटाचा खेळ खेळताना दिसून आले आहेत.
भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे कायम चर्चेत असतात. कधी त्यांचा लस घेतानाचा फोटो व्हायरल होतो तर कधी त्यांचं एखादं विधान चर्चेत येतं. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. पण यावेळी ते गावकऱ्यांसोबक सारीपाट खेळताना दिसून आल्याने चर्चेत आले आहेत.
काही कामानिमित्त निल्लोड येथे गेले असता त्या ठिकाणच्या गावकऱ्यांसोबत रावसाहेब सारीपाट खेळत होते. तेथील गावकऱ्यांनी खूप आग्रह केल्यानंतर रावसाहेब सारीपाट खेळायला बसले होते. अगदी सामन्यांप्रमाणे रावसाहेब जमिनीवर बसून सारीपाट खेळाचा आनंद घेताना व्हि़डीओत दिसून येत आहेत.
