Ratnagiri | रत्नागिरी किनारपट्टी भागात पावसाची हजेरी, साडे तीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार

| Updated on: Jun 10, 2021 | 10:28 AM

आज दुपारनंतर साडेतीन मीटर उंचीच्या लाटा किनारपट्टी भागात पाहायला मिळणार आहेत. मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर अमावास्येचं हे पहिले उड्डाण असणार आहे. किनारपट्टी भागात आज साडेतीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

Follow us on

पावसाच्या पाण्याचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर आता समुद्राने सुद्धा रौद्ररूप धारण केले. आज सकाळपासून समुद्र खवळलेला आहे. दमदार पाऊस तर दुसरीकडे समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप किनारपट्टी भागात पाहायला मिळते. आज दुपारनंतर साडेतीन मीटर उंचीच्या लाटा किनारपट्टी भागात पाहायला मिळणार आहेत. मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर अमावास्येचं हे पहिले उड्डाण असणार आहे. किनारपट्टी भागात आज साडेतीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात अलर्ट जारी केलाय.