Ratnagiri Rain | रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट जारी, किनारपट्टी भागात पावसाच्या सरी

| Updated on: Jun 10, 2021 | 10:19 AM

मुंबई, कोकणासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, किनारपट्टी भागात आज सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर रायगडमध्ये रेड अलर्ट आहे.

Follow us on

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मुंबई, कोकणासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, किनारपट्टी भागात आज सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर रायगडमध्ये रेड अलर्ट आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज दुपारनंतर साडेतीन मीटर उंचीच्या लाटा किनारपट्टी भागात पाहायला मिळणार आहेत. मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर अमावास्येचं हे पहिले उड्डाण असणार आहे. किनारपट्टी भागात आज साडेतीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात अलर्ट जारी केलाय. Ratnagiri Rain Update Orange Alert And Heavy Rain Expected