Ravindra Dhangekar :  महापौर असताना पुणे पालिकेची पाटी लावायचे अन्…VIDEO शेअर करत धंगेकरांकडून मोहोळांवर खळबळजनक आरोप

Ravindra Dhangekar : महापौर असताना पुणे पालिकेची पाटी लावायचे अन्…VIDEO शेअर करत धंगेकरांकडून मोहोळांवर खळबळजनक आरोप

| Updated on: Oct 24, 2025 | 5:26 PM

आमदार रवींद्र धंगेकर यांनी माजी महापौर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महापौर असताना मोहोळ बिल्डर बढेकर यांच्या गाडीचा वापर करत होते, असे धंगेकर यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे. बढेकर बिल्डर मोहोळ यांचे पार्टनर असून त्यांनी जैन हॉस्टेल लिलावात भाग घेतला होता. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची धंगेकर यांची मागणी आहे.

आमदार रवींद्र धंगेकर यांनी माजी महापौर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. धंगेकर यांच्या म्हणण्यानुसार, महापौरपदावर असताना मोहोळ हे पुणे पालिकेची पाटी लावून बिल्डर बढेकर यांची गाडी वापरत होते. धंगेकर यांनी आरोप केला आहे की, कोथरुडचे बिल्डर बढेकर हे मोहोळ यांचे पार्टनर आहेत. बिल्डर बढेकर यांनी जैन हॉस्टेल खरेदीसाठी झालेल्या लिलावात भाग घेतला होता, असेही धंगेकर यांनी म्हटले आहे. बिल्डरला फायदा होईल असे किती प्रकल्प मोहोळ यांनी मंजूर करून दिले, असा सवाल देखील धंगेकरांनी उपस्थित केला आहे.

कोथरूडमधील अनेक इमारतींचे पुनर्विकासाचे प्रकल्प बढेकर बिल्डरकडे आहेत. या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर, जैन बोर्डिंग प्रकरणी झालेला व्यवहार रद्द करण्यात यावा, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. तसेच, जमीन लुटणाऱ्या प्रत्येकावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. या आरोपांमुळे पुणे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Oct 24, 2025 05:26 PM