Ravindra Dhangekar : पक्ष चेंज, पॅटर्न चेंज? पक्षबदलानंतर रवींद्र धनगेकरांचं मौन, पुणेकर म्हणताय व्हेअर इज धंगेकर?

Ravindra Dhangekar : पक्ष चेंज, पॅटर्न चेंज? पक्षबदलानंतर रवींद्र धनगेकरांचं मौन, पुणेकर म्हणताय व्हेअर इज धंगेकर?

| Updated on: Oct 01, 2025 | 10:41 AM

कधीकाळी सामान्य पुणेकरांचा आवाज असलेले रवींद्र धनगेकर काँग्रेसमधून शिंदे गटात गेल्यानंतर राजकीय पटलावरून गायब झाले आहेत. पुण्यात वाढणारे ड्रग्जचे जाळे, टोळीयुद्धे आणि गुंड घायवळच्या पलायनासारख्या गंभीर मुद्द्यांवर त्यांनी धारण केलेले मौन पुणेकरांना खटकत आहे. त्यामुळे व्हेअर इज धनगेकर असा प्रश्न विचारला जात आहे.

पुण्याच्या राजकारणात कधीकाळी सामान्य पुणेकरांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे रवींद्र धंगेकर सध्या अज्ञातवासात गेल्याचे चित्र आहे. काँग्रेसमधून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ते पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरून जणू काही अदृश्यच झाले आहेत. पुण्यात सध्या टोळीयुद्धे, ड्रग्जचे वाढते नेटवर्क आणि गुंड घायवळच्या पलायनासारख्या गंभीर समस्यांनी डोके वर काढले आहे.

यापूर्वी धंगेकर अशा मुद्द्यांवर कोणतीही भीडभाड न बाळगता आक्रमकपणे आवाज उठवत असत. त्यामुळे त्यांच्या पक्षबदलानंतर त्यांचे बदललेले वर्तन पुणेकरांना खटकत आहे. यामुळेच, पूर्वी भाजपने त्यांना हू इज धंगेकर असे डिवचले असताना, आता त्याच भाजपच्या मित्रपक्षात गेल्यानंतर व्हेअर इज धंगेकर असा प्रश्न विचारला जात आहे. त्यांची ही अनुपस्थिती पुणेकरांना जाणवत असून, त्यांना पुन्हा एकदा सक्रिय होऊन प्रश्न विचारावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुंड घायवळचा बनावट पासपोर्टवर देश सोडून पसार होणे, यात राजकीय बळ असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Published on: Oct 01, 2025 10:41 AM