Ravindra Dhangekar : धंगेकरांना मंत्री मोहाळांवर 30 हजार कोटींची शंका! थेट जुना Video बाहेर काढला अन्…

Ravindra Dhangekar : धंगेकरांना मंत्री मोहाळांवर 30 हजार कोटींची शंका! थेट जुना Video बाहेर काढला अन्…

| Updated on: Oct 23, 2025 | 10:58 AM

पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी शिंदे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोहोळांनी गोखले बिल्डर्सची जाहिरात करणारा जुना व्हिडिओ ट्वीट करत, ३० हजार कोटींच्या संभाव्य फायद्यात त्यांची कथित भागीदारी असल्याचा दावा धंगेकरांनी केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली.

पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धंगेकर यांनी मोहोळ यांचा गोखले बिल्डर्सच्या एका प्रकल्पाची जाहिरात करणारा जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओद्वारे धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर गोखले बिल्डर्ससोबत ३० हजार कोटींच्या संभाव्य व्यावसायिक फायद्यात भागीदारी असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

या आरोपांवर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, त्यांनी २५ नोव्हेंबर २०२४ रोजी संबंधित एलएलपीमधून राजीनामा दिला असून ते आता गोखले बिल्डरचे भागीदार नाहीत. मात्र, धंगेकरांनी मोहोळ केवळ कागदोपत्री बाहेर पडले असल्याचा दावा करत ५० टक्के शेअर्स कोणाला हस्तांतरित केले याची माहिती मागितली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे आणि धर्मादाय आयुक्तांवर कारवाई करावी अशी मागणी धंगेकरांनी केली आहे.

Published on: Oct 23, 2025 10:58 AM