RCB News Update : आरसीबीच्या विजय मिरवणुकीत अनर्थ घडला; गर्दी, गोंधळ, चेंगराचेंगरी अन् 8 जणांचा मृत्यू

RCB News Update : आरसीबीच्या विजय मिरवणुकीत अनर्थ घडला; गर्दी, गोंधळ, चेंगराचेंगरी अन् 8 जणांचा मृत्यू

| Updated on: Jun 04, 2025 | 6:12 PM

Bengaluru News : बंगळुरू शहरातून मोठी माहिती समोर येत आहे. आरसीबीसाठी आयोजित केलेल्या विजय रॅलीला गालबोट लागलं आहे.

आरसीबीच्या विजय मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाल्याने 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यात आरसीबी विरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या सामन्यात आरसीबीने विजय मिळवत आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. तब्बल 18 वर्षांनी आरसीबीला हा विजय मिळाला आहे. याच विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी आज विजय मिरवणुक काढण्यात आली. याच मिरवणुकीत चेंगराचेंगरी झालेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही चेंगराचेंगरी इतकी भयंकर होती की यात आही लोकांना आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे.

बंगळुरू संघाच्या विजयानंतर आज बंगळुरूत विजय मिरवणूक आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी बंगळुरू शहरातील एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर या संघाचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते. हे सर्वजण बंगळुरूच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत होते. मात्र याच वेळी अचानक येथे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले नेमके कोण आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाहीत.

Published on: Jun 04, 2025 06:12 PM