Special Report | राजेंच्या वडिलांचा गौफ्यस्फोट, ‘अपक्ष खेळी फडणवीसांची’!

| Updated on: May 28, 2022 | 9:20 PM

संभाजीराजेंना अपक्ष म्हणून राज्यसभेला उतरवण्याची खेळी देवेंद्र फडणवीस यांचीच होती, असा गौप्यस्फोट संभाजी छत्रपती यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाजांनी केला. तसेच संभाजीराजेंना तिकीट न मिळणं हा छत्रपती घराण्याचा अवमान म्हणता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow us on

YouTube video player

कोल्हापूर : कोणत्याही पक्षात प्रवेश नको म्हणून त्यांनी अपक्ष लढण्यावरच भर दिला. संभाजीराजे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अनेक तर्क लढवले गेले. छत्रपती घराण्याने कोणत्याही पक्षात प्रवेश करणं योग्य नसल्यानेच संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचं सांगितलं जात आहे. तर, राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजेंना शिवसेनेत प्रवेश करण्यात काय अडचण होती? असा सवालही केला जात आहे. तर, संभाजीराजेंना अपक्ष म्हणून राज्यसभेला उतरवण्याची खेळी देवेंद्र फडणवीस यांचीच होती, असा गौप्यस्फोट संभाजी छत्रपती यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाजांनी केला. तसेच संभाजीराजेंना तिकीट न मिळणं हा छत्रपती घराण्याचा अवमान म्हणता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.