Anil Parab | फडणवीसांनी दिलेल्या सूचनांवर आम्ही विचार करू : अनिल परब

Anil Parab | फडणवीसांनी दिलेल्या सूचनांवर आम्ही विचार करू : अनिल परब

| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 10:57 PM

फडणवीसांनीही या अनुषंगाने काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचा आम्ही जरूर विचार करू. चर्चा सकारात्मक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं परब म्हणाले.

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आज एसटी कामगारांच्या शिष्टमंडळासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर अनिल परब यांनी सागर बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली. नंतर परब यांनी मीडियाशी संवाद साधला. एसटी कर्मचाऱ्यांशी आजही चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. फडणवीसांनीही या अनुषंगाने काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचा आम्ही जरूर विचार करू. चर्चा सकारात्मक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं परब म्हणाले.