Delhi Lal Quila Blast : दिल्ली स्फोटातील i-20 चा शेवटचा मालक सापडला, पुलवामाशी काय कनेक्शन?
दिल्लीतील लाल किल्ला स्फोटात वापरलेल्या i20 कारचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. उमर बदरपूर टोल नाक्यातून दिल्लीत दाखल झाला होता आणि लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये दिसला. उमरच्या कुटुंबीयांनी कार त्यांची नसल्याचा दावा केला आहे. पुलवामाचा तारीक या i20 कारचा शेवटचा मालक असून, डॉ. मुजम्मिल शकीलच्या अटकेनंतर त्याने हा हल्ला केल्याचा संशय आहे.
दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाच्या तपासात नवीन माहिती समोर आली आहे. स्फोटासाठी वापरलेल्या i20 कारचे सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांना मिळाले आहे. या फुटेजनुसार, उमर नावाची व्यक्ती बदरपूर टोल नाक्याहून सकाळी ८ वाजून १३ मिनिटांनी दिल्लीत दाखल झाली होती. उमरने मास्क घातलेला होता आणि त्याची कार पीयुसी चेक करतानाही दिसली. लाल किल्ल्याच्या पार्किंगमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये उमर मोहम्मद स्फोटातील गाडीसह ३ वाजून १९ मिनिटांनी पार्किंगमध्ये शिरताना आणि ६ वाजून ४८ मिनिटांनी बाहेर पडताना दिसला.
उमरच्या कुटुंबीयांनी मात्र ही i20 गाडी त्यांची नसल्याचा दावा केला आहे. तपासातून समोर आले आहे की, पुलवामा येथे राहणारा तारीक या i20 कारचा शेवटचा मालक होता. स्फोटापूर्वी ही कार सुनेहरी मशिदीजवळ तीन तास पार्क केलेली होती. या कारचा मूळ मालक दिल्लीतील मोहम्मद सलमान होता, ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तारीक हा फरीदाबादमध्ये राहत होता आणि पुलवामा येथील डॉ. मुजम्मिल शकीलच्या अटकेनंतर त्याने हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
