मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलणार? काय असणार नवं नाव? कोणी केली मागणी?
पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाचं असणाऱ्या रेल्वे स्थानकाचं नाव बदलणार? कोण करतंय मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नावं बदलण्याची मागणी? मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलून काय ठेवण्याची होतेय मागणी?
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नावं बदलावं यासाठी मागणी करण्यात येत आसल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आलं आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेर संघर्ष समितीचं आंदोलन सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल हे एक महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नावं बदलण्यात यावं यासाठी मागणी होताना दिसतेय. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलून त्याऐवजी जगन्नाथ नाना शंकरशेठ असं व्हावं याकरता संघर्ष समितीकडून सातत्याने मागणी केली जात आहे. आज मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेर संघर्ष समितीकडून जोरदार आंदोलन सुरू असताना त्यांच्या हातात काही फलक देखील पाहायला मिळाले. यावर ३१ जुलैला नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस नामकरण सोहळा झालाच पाहिजे, असा मजकूर असून मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस असं नामकरण व्हावं, अशी मागणी देखील या फलकांवर लिहिलेली आहे.
