Republic Day : दिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनात ‘नारीशक्ती’चं दर्शन, बघा व्हिडीओ

| Updated on: Jan 26, 2023 | 12:03 PM

लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वेगवेगळ्या तुकड्यांचे कर्तव्यपथावर संचलनात आपला सहभाग दर्शवत दिमाखदार संचलन

Follow us on

देशभरात ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे देशभरात आयोजन करण्यात आले आहे. अशातच दिल्लीच्या कर्तव्यपथावर परेड आणि पथसंचलन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वेगवेगळ्या तुकड्यांनी कर्तव्यपथावर संचलनात आपला सहभाग दर्शवत दिमाखदार संचलन केले.

दरवर्षी भारताच्या सैन्य शक्तीचे दर्शन घडत असते. यामध्ये मेड इन इंडिया शस्त्रास्त्र, मिसाईल्स, रडार्स यांचाही समावेश आहे. यावेळी पुरूषांसह नारी शक्तीचेही दर्शन कर्तव्य पथावर बघायला मिळाले. तर भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ देखील कर्तव्य पथावर पाहायला मिळाले. या चित्ररथांच्या माध्यमातून देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि मजबूत अंतर्गत-बाह्य सुरक्षेचे दर्शन देखील दिसून आले. कर्तव्य पथावर एकूण २३ चित्ररथ आहेत. यामध्ये राज्यासह केंद्रशासित प्रदेशांचे १७ चित्ररथ तर इतर मंत्रालय आणि विभाहाचे ६ चित्ररथांचा सहभाग आहे.