Heavy Rain : राज्याच पावसाचे पुनरागमन, खरीप पिकांना मोठा दिलासा

| Updated on: Sep 08, 2022 | 8:54 PM

सध्या खरिपातील पिके ही शेंग अवस्थेत आहेत. त्यामुळे अशा वेळी पाऊस झाल्याने उत्पादनात वाढ होणार असल्याचे कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. पिकांच्या मशागतीनंतर हा पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक भागात पावसाचे पुनरागमन झाले आहे. मुसळधार पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला असून अल्हादायक वातावरण झाले आहे.

Follow us on

मुंबई : राज्याच्या राजधानीसह विविध भागात (Heavy Rain) पावसाचे पुनरागमन झाले आहे. गुरुवारी सायंकाळी मुंबई शहरासह उपनगरामध्ये आणि वाशिम, सोलापूर, मानगाव, उस्मानाबाद, नवी मुंबई या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांबाबत चिंता व्यक्त केली जात होती. गुरुवारी अचानक सुरु झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली असली तरी हा पाऊस खरीप हंगामातील सर्वच (Nurturing environment ) पिकांसाठी पोषक मानला जात आहे. सध्या खरिपातील पिके ही शेंग अवस्थेत आहेत. त्यामुळे अशा वेळी पाऊस झाल्याने उत्पादनात वाढ होणार असल्याचे कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. पिकांच्या मशागतीनंतर हा पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक भागात पावसाचे पुनरागमन झाले आहे. मुसळधार पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला असून अल्हादायक वातावरण झाले आहे.