Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार!
शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांच्यावर पक्षाच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे रोहित पवार आता पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.
पक्षात नुकताच खांदेपालट झाला असून, जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच रोहित पवार यांना मुख्य सचिवपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात शीतयुद्ध असल्याच्या चर्चा होत्या, ज्यामुळे पाटील प्रदेशाध्यक्ष असताना रोहित पवार यांना कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आली नव्हती. आता शशिकांत शिंदे यांच्या नियुक्तीनंतर रोहित पवार यांना मुख्य सचिवपद देऊन पक्षाने नव्या दिशेने पाऊल टाकले आहे.
