चाललंय काय? सुप्रिया सुळे आक्रमक, दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला

चाललंय काय? सुप्रिया सुळे आक्रमक, दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला

| Updated on: May 07, 2024 | 2:25 PM

दत्तात्रय भरणे यांनी काही कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केला आहे. या प्रकरणानंतर सुप्रिया सुळे या चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाल्या. शिवीगाळ केल्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यावरून बारामतीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.

इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी काही कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केला आहे. या प्रकरणानंतर सुप्रिया सुळे या चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाल्या. सुप्रिया सुळे या तडक दत्ता भरणे यांच्या गावात गेल्या. ज्या कार्यकर्त्याला शिवीगाळ झाली, त्याची जाऊन भेट घेतली. पैसे वाटण्याचा प्रकार सुरु आहे. काय चाललय? तक्रार का दाखल करुन घेत नाही? असा सवाल करत त्यांनी आयोगाला सवाल केला. दरम्यान, बारामतीमध्ये काल रात्री मोठ्या प्रमाणात पैसा वाटण्यात आला, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. रोहित पवारांनी त्या प्रकाराचेही व्हिडीओ ट्वीट केले आहेत. हेच व्हिडीओ सध्या बारामतीत व्हायरल होत असून बारामतीतील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: May 07, 2024 02:25 PM