Mohan Bhagwat : जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात – मोहन भागवत

Mohan Bhagwat : जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात – मोहन भागवत

| Updated on: Apr 25, 2025 | 9:13 AM

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी दुष्ट माणसांचं निर्दालन होईल अशीही अपेक्षा व्यक्त केली.

जगात एकच धर्म मानव धर्म आहे आणि त्यालाच हिंदू धर्म म्हणतात असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हंटलं आहे. आपल्या लोकांनी कधी कोणाला धर्म विचारून मारलं नाही. रावण सुधरला नाही म्हणून रामाने वध केला, असंही मोहन भागवत यांनी म्हंटलं आहे. तसंच दुष्ट माणसांचं निर्दालन होईल अशीही अपेक्षा यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पहलगाममध्ये कट्टरपंथियांनी जे केल ते आपले हिंदू करणार नाही.

Published on: Apr 25, 2025 09:11 AM