नारायण राणेंच्या बंगल्यातील बांधकाम न पाडल्यास BMC आयुक्तांविरोधात तक्रार करणार : संतोष दौडकर
महापालिकेनं अनधिकृत बांधकाम न पाडल्यास पालिका आयुक्तांविरोधात तक्रार करु, असा इशारा दौंडकर यांनी दिला आहे.
मुंबई महापालिकेकडून (BMC) नारायण राणे (Narayan Rane) यांना जुहूतील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात तिसरी नोटीस बजावण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी केली होती. नारायण राणे यांना ही तिसऱ्यांदा नोटीस देण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या बंगल्याला 16 मार्चला आणखी एक नोटीस देण्यात आल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेनं अनधिकृत बांधकाम न पाडल्यास पालिका आयुक्तांविरोधात तक्रार करु, असा इशारा दौंडकर यांनी दिला आहे.
