Rupali Chakankar : टिकेनंतर चाकणकरांचा ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम

Rupali Chakankar : टिकेनंतर चाकणकरांचा ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम

| Updated on: May 30, 2025 | 1:27 PM

Rupali Chakankar In Nashik : वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोग आणि रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर आज महिला आयोगाने नाशिकमध्ये महिला आयोग आपल्या दारी उपक्रम राबवला आहे.

तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी महिला आयोगाची आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हंटलं आहे. आज नाशिकमध्ये ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रुपाली चाकणकर यांच्यावर चहू बाजूने टीका झाल्यानंतर त्या आज नाशिकमध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी दाखल झाल्या.

यावेळी रूपाली चाकणकर म्हणाल्या की, महिलांच्या बाजूने कायदा आहे. मात्र, त्यातून पळवाट काढली जाते. तक्रारीचे निवारण करण्यासाठी पॅनल तयार करण्यात आले आहे. महिलांच्या तक्रारीची दखल पोलीस आणि इतर कोणत्याही यंत्रणांनी घेतली नाही तर शेवटी महिला आयोग आहे. तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी महिला आयोगाची आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Published on: May 30, 2025 01:23 PM