Rupali Thombare Patil : पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस अन् रुपाली ठोंबरे पाटील दादांच्या भेटीला, म्हणाल्या…
राष्ट्रवादी काँग्रेसने नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. रुपाली चाकणकर यांच्याविरोधात केलेल्या आंदोलनामुळे ही कारवाई झाली असून, ठोंबरे पाटील आता अजित पवारांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासोबत मारहाणीचा आरोप करणारी माधवी खंडाळकरही अजित पवारांना भेटणार आहे. या वादावर अजित पवार काय तोडगा काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. पक्षाच्या विरोधात केलेल्या कथित कारवाई आणि बदनामीच्या आरोपाखाली ही नोटीस देण्यात आली आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी यापूर्वी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात तीव्र आंदोलन केले होते. त्यांच्या फोटोला जोडे मारून घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. नोटीस मिळाल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील तात्काळ पुण्यात अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत.
याचवेळी, रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर मारहाणीचा आरोप करणारी माधवी खंडाळकर ही महिला देखील अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाली आहे. माधवी खंडाळकर यांनी रूपाली पाटील यांच्याविरोधात व्हिडिओ बनवून आरोप केले होते. हे सर्व प्रकरण पक्षाची बदनामी करणारे असल्याने अजित पवार यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार सध्या पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.
