Ajit Pawar NCP :  रुपाली ठोंबरे पाटलांबद्दल राष्ट्रवादीकडून मोठा निर्णय, पक्षांतर्गत वाद ठरला कारणीभूत? खुलाशासाठी 7 दिवस वाट न पाहता…

Ajit Pawar NCP : रुपाली ठोंबरे पाटलांबद्दल राष्ट्रवादीकडून मोठा निर्णय, पक्षांतर्गत वाद ठरला कारणीभूत? खुलाशासाठी 7 दिवस वाट न पाहता…

| Updated on: Nov 10, 2025 | 1:51 PM

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवक्तेपदावरून रुपाली ठोंबरे पाटील यांची उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी हेमलता पाटील आणि प्रतिभा शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यातील सातत्याच्या वादामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा एक महत्त्वाचा बदल मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) प्रवक्तेपदावरून रुपाली ठोंबरे पाटील यांची उचलबांगडी करत मोठी राजकीय घडामोड केली आहे. पक्षाने नुकतीच नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली असून, यामध्ये रुपाली ठोंबरे पाटील यांचे नाव नाही. त्यांच्या जागी आता हेमलता पाटील आणि प्रतिभा शिंदे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली ठोंबरे पाटील आणि पक्षातील अन्य नेत्या रुपाली चाकणकर यांच्यात सातत्याने मतभेद आणि परस्परविरोधी वक्तव्ये समोर येत होती. याच वादामुळे पक्षाने रुपाली ठोंबरे पाटील यांना नोटीस देखील बजावली होती. या सर्व घडामोडींनंतर पक्षाने प्रवक्तेपदाच्या यादीतून त्यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात महत्त्वाचा मानला जात आहे. आता रुपाली ठोंबरे पाटील या निर्णयावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Nov 10, 2025 01:51 PM