युक्रेनची राजधानी कीवमधील एका शॉपिंग सेंटर आग
Image Credit source: tv9

युक्रेनची राजधानी कीवमधील एका शॉपिंग सेंटर आग

| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 9:49 AM

रशियाकडून युक्रेनवरती जोरदार हल्ला सुरू असून तेथील लोक अत्यंत भितीच्या सावटाखाली जगत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून बॉम्ब हल्ले सुरू असल्याने अनेक ठिकाणी आगी लागल्याचे पाहायला मिळत आहे.

रशियाकडून युक्रेनवरती जोरदार हल्ला सुरू असून तेथील लोक अत्यंत भितीच्या सावटाखाली जगत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून बॉम्ब हल्ले सुरू असल्याने अनेक ठिकाणी आगी लागल्याचे पाहायला मिळत आहे. युक्रेनची राजधानी कीवमधील एका शॉपिंग सेंटर आग लागल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. रशियाने युक्रेन (Russia-Ukraine) मधील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे, आत्तापर्यंत रशियाकडून युक्रेन देशाचं खूप मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे तिथली परिस्थीती अत्यंत वाईट असल्याचे आपण व्हिडीओ (Russia-Ukraine Crisis video) पाहतोय. सध्या दोन्ही देशांमध्ये वारंवार हल्ले सुरू असून त्यामध्ये अनेक सामान्य लोकांचे मृत्यू होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे युक्रेनमधील भीतीच्या सावटाखाली आहेत. रशियाने युक्रेनविरुद्ध प्रतिबंधित थर्मोबॅरिक शस्त्रे वापरल्याचे दावा युक्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोव्हा (Oksana Markarova) यांनी केला आहे. तसेच यामुळे शक्तीशाली स्फोट घडवण्यासाठी परिसरातील ऑक्सीजन शोषून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिनिव्हा करारानुसार थर्मोबॅरिक शस्त्रे पारंपारिक दारूगोळा बंदी असल्याचे देखील क्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोव्हा यांनी म्हणटले आहे. त्यामुळे सध्याची युक्रेनमधील स्थिती अत्यंत वाईट असून दुस-या देशातील तिथं वास्तव करीत असलेली अनेक लोक तिथं अडकली आहेत. तसेच युक्रेनमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत.