कीव हवाई हद्दीत शिरला रशियन हेलिकॉप्टरचा ताफा
रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) आज सातवा दिवस आहे. चर्चेच्या फैरीनंतरही युक्रेनवरील (Ukraine) हल्ले थांबलेले नाहीत.
Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) आज सातवा दिवस आहे. चर्चेच्या फैरीनंतरही युक्रेनवरील (Ukraine) हल्ले थांबलेले नाहीत. उलट आज सातव्या दिवशी रशियाने (Russia) युक्रेनवरील हल्ले वाढवले आहेत. रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमध्ये आतापर्यंत 13 बालकांसह कमीत कमी 136 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक सैनिकांचाही मृत्यू झाला असून शेकडो सैनिक जखमी झाले आहे. आता रशियन हेलिकॉप्टरचा ताफा कीव हवाई हद्दीत शिरला आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी कीववर हवाई हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Published on: Mar 02, 2022 02:03 PM
