Special Report | बेलगाम रशिया, बेचिराख युक्रेन -Tv9

Special Report | बेलगाम रशिया, बेचिराख युक्रेन -Tv9

| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 10:23 PM

रशियाने युक्रेनवर हवाई हल्ले तीव्र केले आहेत. राजधानी कीवसह अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, कीवमध्ये एकाच वेळी भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. त्यामुळे रशियाने हल्ले आणखी तीव्र केल्याचे सांगण्यात येत आहे.

रशियाने युक्रेनवर हवाई हल्ले तीव्र केले आहेत. राजधानी कीवसह अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, कीवमध्ये एकाच वेळी भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. त्यामुळे रशियाने हल्ले आणखी तीव्र केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या युद्धाची दाहकता आणकी वाढली आहे. युद्ध थांबवण्याासाठी जगभरातून रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. मात्र अजूनही युद्ध शांत व्हायचे नाव घेत नाही. युक्रेनच्या लष्कराच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंतच्या युद्धात रशियाचे खूप नुकसान झाले आहे. रशियाने 9000 सैनिक गमावले आहेत. याशिवाय, 30 विमाने, 374 कार, 217 टँक आणि 900 आर्म्ड पर्सनल कॅरियर्स गमावले आहेत. याशिवाय त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. यात आता कुणाचे दावे किती खरे हे सांगणे आत्ताच कठीण असले, तरी युक्रेनमधील जे व्हिडिओ समोर येत आहेत ते अत्यंत बिकट आहेत.