रशिया युक्रेन विध्वंस सुरुच, हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान

| Updated on: Apr 01, 2022 | 11:00 AM

जोपर्यंत युक्रेन संपूर्ण शरणागती पत्कारणार नाही तोपर्यंत  युद्ध सुरूच राहणार असल्याची भूमिका रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी घेतली आहे. त्यामुळे आता युद्ध आणखी चिरघळण्याची शक्यता आहे.

Follow us on

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. युद्धाच्या भीतीपोटी आतापर्यंत लाखो लोकांनी युक्रेन सोडून शेजारील देशात आश्रय घेतला आहे. युद्धा सुरू होऊन महिना झाला तरी युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. जोपर्यंत युक्रेन संपूर्ण शरणागती पत्कारणार नाही तोपर्यंत  युद्ध सुरूच राहणार असल्याची भूमिका रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी घेतली आहे. त्यामुळे आता युद्ध आणखी चिरघळण्याची शक्यता आहे.