Saamana : 11 वर्षापासून केंद्राच्या दबावाखाली, राव गेले अन् पंत….; सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर ‘सामना’तून नाराजी
सामना वृत्तपत्राने सर्वोच्च न्यायालयावर गंभीर टीका केली आहे. गेल्या 11 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायधीश नियुक्त्या आणि शिवसेना पक्षचिन्हासारख्या निर्णयांवरून न्यायालयाने निर्भिडपणा गमावल्याचे सामनातून म्हटले आहे. या टीकेमुळे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सामना वृत्तपत्राने सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 11 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप सामनातून करण्यात आला आहे. न्यायधीश सूर्यकांत यांच्या सरन्यायाधीश पदावरील नियुक्तीनंतर आलेल्या प्रतिक्रियेत हे भाष्य करण्यात आले आहे. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यात डॉ. आंबेडकरांचा निर्भयपणा दिसला नाही असे म्हटले आहे. न्यायालय आता निर्भिड आणि प्रामाणिक राहिलेले नाही असा दावाही सामनातून करण्यात आला आहे. शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष बेकायदेशीररित्या एका गटाला सोपवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय “मूर्खपणाचाच” होता आणि तो अमित शहांच्या दबावाखाली घेण्यात आला असेही सामनाने म्हटले आहे. भाजपचे प्रवक्ते म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नेमल्या गेल्या, तरी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश गप्प बसल्याचेही सामनात नमूद करण्यात आले आहे. देशात घटनाबाह्य कामे सुरूच राहतील, अशी चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.
