“देशात हिंसा घडवण्याचा प्रयत्न भाजप…, पण महाराष्ट्र झुरळांच्या मिश्यांची पर्वा कशाला करेल?”, सामनातून हल्लाबोल

“देशात हिंसा घडवण्याचा प्रयत्न भाजप…, पण महाराष्ट्र झुरळांच्या मिश्यांची पर्वा कशाला करेल?”, सामनातून हल्लाबोल

| Updated on: Aug 05, 2023 | 9:33 AM

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केलं. यावरुन संभाजी भिडे यांच्याविरोधात सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संभाजी भिडे आणि भाजपवर टीका करण्यात आली आहे.

मुंबई, 5 ऑगस्ट 2023 | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केलं. यावरुन संभाजी भिडे यांच्याविरोधात सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संभाजी भिडे आणि भाजपवर टीका करण्यात आली आहे. आगी कोण लावतोय? या शीर्षकाखाली हा अग्रलेख छापण्यात आला आहे. सध्या काही लोक मिशी व दाढीवर बोटे फिरवत उसने अवसान आणत आहेत. आत्याबाईंच्या मिश्यांप्रमाणे त्यांची अवस्था आहे, पण झुरळांनाही मिश्या असतात व अनेकदा फवारणी करून ढेकूण व झुरळे मारावी लागतात. शिवरायांच्या महाराष्ट्रात आगी लावण्याचे कंत्राट कोणी घेतले असेल तर जनतेने सावध राहायला हवे. फडणवीसांना गुरुजी असतील, पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर आहे. मणिपूर, हरयाणाच्या वाटेने महाराष्ट्र जाणार नाही, असं सामनाच्या अग्रलेखात छापण्यात आलं आहे.

Published on: Aug 05, 2023 09:33 AM