Sara Tendulkar : असा झाला कार्यक्रम… सारा तेंडुलकरची नवी इनिंग, ‘त्या’ खास व्यक्तीचीही हजेरी
सारा तेंडुलकरच्या पिलेट्स अकॅडमीच्या उद्घाटनानंतर सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मुलीच्या यशाचा आनंद दिसत होता. मात्र, यावेळी अर्जुन तेंडुलकर दिसला नाही.
मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने मुंबईत पिलेट्स स्टुडिओ सुरू केला आहे. सचिन तेंडुलकरने स्वतः सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना माहिती देत हा आनंदाचा क्षण शेअर केला. सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने सारा तेंडुलकरला या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी त्याने काही फोटो शेअर केले आहे. सारा तेंडुलकरच्या या नव्या इनिंगला सुरूवात करताना या खास प्रसंगी सारा तेंडुलकरची होणारी वहिनी आणि अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक देखील तिच्या पिलेट्स स्टुडिओच्या भव्य उद्घाटनाला उपस्थित होती.
सारा तेंडुलकरच्या पिलेट्स अकॅडमीचा मुंबईत उद्घाटन सोहळा पार पडला. यासंदर्भात सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टमधील फोटोंमध्ये त्याची होणारी सूनही दिसत आहे. सारा तेंडुलकरने तिचे वडील सचिन, आई अंजली तेंडुलकरसह संपूर्ण परिवारासह रिबन कट करून पिलेट्स अकॅडमी स्टुडिओचे उद्घाटन केले. या आनंदाच्या प्रसंगी केकही कट करण्यात आला. सचिन तेंडुलकरने साराच्या स्वप्न पूर्ण करण्याच्या अथक परिश्रमाचे आणि तिच्या इथपर्यंतच्या प्रवासाचे कौतुक केले.
