VIDEO : Saif ali khan | सैफ-करीनाच्या दुसऱ्या मुलाचे नाव समोर, जहांगीर अली खान
प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव अखेर सार्वजनिक झाले आहे. या दामपत्याच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर आहे. सैफ आणि करिना यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाला फेब्रुवारीमध्ये जन्म दिला होता.
प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव अखेर सार्वजनिक झाले आहे. या दामपत्याच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर आहे. सैफ आणि करिना यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाला फेब्रुवारीमध्ये जन्म दिला होता. तेव्हापासून त्यांच्या या मुलाचे नाव गुलदस्त्यात होते. करीना कपूरने नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकात तिच्या मुलाचे नाव देण्यात आले आहे. करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी त्यांच्या पहिल्या आपत्याला 20 डिसेंबर 2016 मध्ये जन्म दिला. पहिले मुल होताच त्यांनी त्याचे नाव जाहीर केले. या जोडीने त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव तैमुर असे ठेवले.
